Ad will apear here
Next
पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचा नागरी सत्कार


वाडा :
येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी तालुक्यातील वडवली या गावातील निवृत्त उपजिल्हाधिकारी नामदेव जाधव व त्यांचे भाऊ प्रकाश जाधव यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा तपास अवघ्या महिन्याभरात पूर्ण केला. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून कुडूस ग्रामपंचायत सभागृहात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश चौधरी यांनी केले. दरोड्याचा प्रकार ज्या घरी झाला ते घरमालक प्रकाश जाधव यांनी दरोड्याचा पूर्ण घटनाक्रम सांगितला. या नंतर श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विजय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सत्कारमूर्ती शिंदे यांनी दरोड्याचा तपास करताना आलेले अनुभव सांगितले. ते म्हणाले, ‘दरोडेखोर उत्तर प्रदेशमध्ये आहेत हे समजल्याने आम्ही तिकडे गेलो; मात्र अनुभव विचित्र आला. हवे तेवढे सहकार्य मिळत नव्हते. अखेर वेषांतर करून आम्ही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.’ 

या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी वाडा पोलीस ठाण्यात कर्मचारी वाढविण्याची मागणी केली. या कार्यक्रमात कुडूसच्या सरपंच छबीताई तुंबडे, उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते इरफान सुसे, रामदास जाधव, माजी सरपंच भगवान चौधरी, समता प्रतिष्ठानचे स्वप्नील जाधव, श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विजय जाधव, व्यापारी संघटनेचे हर्षल देसले, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, ‘आरपीआय सेक्युलर’चे जिल्हा अध्यक्ष रमेश भोईर, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, माजी सरपंच दिलीप पाटील आदी मान्यवर व पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कुडूस, आम्ही वडवलीकर, समता प्रतिष्ठान, महिला बचत गट, व्यापारी संघटना यांनी संयुक्तपणे केले होते. सूत्रसंचालन मनेश पाटील यांनी केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZJSBS
Similar Posts
भैयासाहेब आंबेडकर यांना अभिवादन वाडा : भारतीय बौद्ध महासभा, वाडा तालुका यांच्या वतीने रमाईनगर नेहरोली (ता. वाडा, जि. पालघर) येथे सूर्यपुत्र यशवंतराव (भैयासाहेब) आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बौद्धाचार्य, उपासक, उपासिका व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सामूहिक सूत्रपठण आयोजित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी पालघर : भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांची १०६‌वी जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वाडा तालुका शाखेतर्फे वाडा तालुक्यातील रमाई नगर-कुडूस बुद्धविहारामध्ये साजरी करण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ९३वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात ठाणे : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील संघटनेतर्फे पक्षाचा ९३वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. कुडूस येथून महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या कार्यालयाजवळून काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो जण सहभागी झाले होते.
विरारमंध्ये रंगणार एकता सांस्कृतिक महोत्सव विरार : महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून विचारमंच उपलब्ध करून देणाऱ्या एकता कल्चरल अकादमीतर्फे २१ व २२ डिसेंबर २०१८ या कालावधीत पालघर जिल्ह्यात एकता सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव विरार शहरातील भाऊसाहेब वर्तक हॉल येथे होणार असून, हे या महोत्सवाचे ३० वे वर्ष आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language